तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी
पैठण,दि.१८ : ( अभिजीत सोनवणे )
पैठण तालुक्यातील नांदर, दावरवाडी महसूल मंडळात शनिवारी व रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह वादळ, वार्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आज दुपारी प्रत्यक्ष हजेरी लावून अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली.

डॉ. काळे यांनी यावेळी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान प्रदेश सरचिटणीस रविंद्र काळे, जिल्हा प्रमुख दत्तात्रय गोर्डे, माजी आमदार संजय वाघचौरे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, डॉ. कांचनकुमार चाटे, अनिल पटेल, विनोद तांबे यांच्यासह तहसीलदार ज्योती पवार, तलाठी राम केंद्रे, पोलीस पाटील गोपाल वैद्य, माजी सरपंच यशवंत काळे, मित्रवर्धन काळे, उदयसेन काळे, दादासाहेब सोनवणे, ईश्वर कांबळे, बिलाल पठाण, ज्ञानेश्वर काळे, अजहर शेख तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदर महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने तातडीने मदतकार्य हाती घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




















