Homeताज्या बातम्यामुंबई महापालिकेच्या रणसंग्रामाआधी सायनमध्ये ठाकरे गट – मनसेचं एकत्र आंदोलन, युतीचे संकेत?

मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामाआधी सायनमध्ये ठाकरे गट – मनसेचं एकत्र आंदोलन, युतीचे संकेत?

मुंबई, दि.२४ : मंगेश म्हात्रे

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रतीक्षा नगरमध्ये झालेलं शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचं संयुक्त आंदोलन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरून कंत्राटदाराला खड्ड्यात बसवून जाब विचारणाऱ्या या आंदोलनाने स्थानिक पातळीवर ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांची ताकद दाखवून दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे प्रतीक्षा नगर परिसरातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे निर्माण झाले आहेत. या समस्येकडे महापालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत मनसे शाखाध्यक्ष लवू नर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी विशाल आमकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कंत्राटदाराला प्रतीकात्मकरीत्या खड्ड्यात बसवून जाब विचारण्यात आला.

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर झालेलं हे संयुक्त आंदोलन केवळ रस्त्यांच्या खड्ड्यापुरतं मर्यादित नसून, आगामी निवडणुकांसाठीचा राजकीय प्रयोग मानला जात आहे. ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी कार्यकर्त्यांच्या एकत्रित हालचालींनी संभाव्य युतीला गती मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीकडून भाजप-शिंदे गट एकत्रितपणे निवडणूक लढवणार असताना ठाकरे गट आणि मनसेचे स्थानिक पातळीवरील आंदोलन महायुतीसाठी आव्हानात्मक ठरू शकते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तर मराठी मतांचे समीकरण बदलून मुंबई महापालिकेत सत्तांतर घडविण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवू लागले आहेत.

खड्ड्यांवरून सुरू झालेला संघर्ष, प्रत्यक्षात महापालिकेतील राजकीय खड्डे बुजवण्याचा प्रयत्न असल्याचं भाष्य राजकीय वर्तुळात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!