राक्षसभुवन, दि.२९ : अनंता मोटे
मान्सूनच्या जोरदार पावसाने बीड जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असून काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात येऊ शकतो, याची जाणीव करून देत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे :
मुसळधार पावसात अनावश्यक प्रवास टाळा.
पुलावरून वा नाल्यांवरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नका, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.
नदीकाठच्या गावांनी पाणी वाढताच तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
धरण परिसरात, बंधाऱ्याजवळ वीज पडण्याच्या वेळी थांबू नका.
मुलांना नदी, नाले व धरण परिसरात जाण्यास मज्जाव करा.
पिण्याचे पाणी उकळूनच प्या व आरोग्याची काळजी घ्या.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष (1077) वर संपर्क साधा.
प्रशासनाचे स्पष्ट आवाहन केले आहे की “निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. प्रशासन दक्ष आहे; मात्र नागरिकांनी सहकार्य व सावधगिरी दाखवणे अत्यावश्यक आहे. आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या,” असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मदतीसाठी संपर्क : 02442-299299




















