Homeक्राईमठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी – कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी – कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

ठाणे, दि.२९ : अजय मगरे

मुंब्रा परिसरात ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत ड्रग्ज माफियांना मोठा झटका दिला आहे. पोलिसांनी तब्बल २ कोटी ३८ लाख ८७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

oplus_0

या कारवाईत २ किलो ३७४ ग्रॅम हायब्रीड गांजा (किंमत – २.३७ कोटी रुपये) व १९ MDMA / Ecstasy टॅबलेट्स (किंमत – १.४७ लाख रुपये) हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले व पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली सपोनि निलेश मोरे, सपोनि सोमनाथ कर्णवर पाटील, पोउपनि राजेंद्र निकम, पोउपनि दिपक डुम्मलवाड, पोहवा अमोल देसाई,अजय सकपाळ, शिल्पा कसबे, कोमल लादे यांच्यासह पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

२४ ऑगस्ट रोजी रात्री मुंब्रा बायपासवरील सिम्बायोसीरा शाळेजवळ सापळा रचून पोलिसांनी सुमित राजुराम कुमावत (२१, रा. बोरिवली, मुळ – राजस्थान) याला गजाआड केले. आरोपीकडून मिळालेला मुद्देमाल विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून ४ सप्टेंबरपर्यंत तो पोलिस कोठडीत आहे.

तपासातून समोर आले आहे की जप्त हायब्रीड गांजा व MDMA टॅबलेट्स हे परदेशातून भारतात तस्करी करून आणले जातात. त्यामुळे या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!