Homeमहाराष्ट्रप्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाच्या मुंबईतील १२० सदनिका विक्रीसाठी..

प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाच्या मुंबईतील १२० सदनिका विक्रीसाठी..

५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू

मुंबई: मंगेश म्हात्रे 

म्हाडाच्या मुंबईतील १२० सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे. ही प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर राबवली जाणार आहे.इच्छुक नागरिकांनी https://bookmyhome.mhada.gov.in

या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मंडळामार्फत करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम व अर्ज शुल्क भरणा, योजना/सदनिका निश्चिती करण्याची प्रक्रिया दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सदनिका निश्चित केल्यानंतर ४८ तासांच्या आत विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा करणे बंधनकारक असून, मुदतीत भरणा न झाल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होणार आहे.

या योजनेअंतर्गत शिंपोली (कांदिवली), चारकोप सेक्टर-८, अँटॉप हिल-वडाळा, तुंगा-पवई, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी (मालाड), गायकवाड नगर येथील एकूण ८४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(५) व ३३(७) अंतर्गत प्राप्त झालेल्या घाटकोपर पूर्व, कन्नमवार नगर-विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन, जेव्हीपीडी-अंधेरी पश्चिम येथील ३६ सदनिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

अनामत रक्कम भरल्यानंतर ‘बुक माय होम’ पर्यायावर उपलब्ध सदनिकांची माहिती दिसेल. अर्जदार उपलब्धतेनुसार विंग, इमारत, सदनिका क्रमांक व मजला निवडू शकतात. मात्र, अनामत भरल्यानंतर अर्जात कोणताही फेरफार करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

म्हाडाने स्पष्ट केले आहे की, या योजनेसाठी कोणताही दलाल किंवा प्रतिनिधी नियुक्त केलेला नाही. फसवणुकीचा संशय आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८६९९८८००० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही मुंबई मंडळाने कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!