Homeताज्या बातम्याकोपरगाव आरक्षण क्र. ९९चे क्रीडांगण कधी होणार?

कोपरगाव आरक्षण क्र. ९९चे क्रीडांगण कधी होणार?

नगरपरिषदेच्या उदासीनतेवर संजय काळे यांचा सवाल

कोपरगांव : दिलीप गायकवाड

कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील शहर विकास योजनेंतर्गत आरक्षण क्रमांक ९९ अंतर्गत प्रस्तावित क्रीडांगणाची अंमलबजावणी अद्यापही कागदावरच अडकून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने दि. १२ डिसेंबर २०१२ रोजी मंजूर केलेला व २०१३ पासून अंमलात आलेला हा शासन निर्णय तब्बल १२ वर्षे उलटूनही राबविण्यात आलेला नसल्याचा आरोप सामाजिक नेते संजय काळे यांनी केला आहे.

कोपरगांव शहर हद्दीतील स.नं. ४५ पै., ४६, ४७ व ४८ पै. या एकूण ७.०८ हेक्टर क्षेत्रावर आरक्षण क्रमांक ९९ अंतर्गत क्रीडांगण विकसित करण्यास शासनाची मान्यता आहे. मात्र सदर भूखंड डेअरी, पोल्ट्री व ब्रीडिंग फार्मच्या मालकीचा असूनही तो सध्या पूर्णतः पडीत अवस्थेत असून नगरपरिषदेने याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.

साईबाबा कॉर्नर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जी लगत असलेला हा भूभाग शहराच्या अगदी जवळ असूनही सर्वसामान्य नागरिकांसाठी व्यायाम, फिरणे वा विरंगुळ्यासाठी एकही सुसज्ज क्रीडांगण गेल्या बारा वर्षांत उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तसेच शहरातील शाळा व महाविद्यालयेही आपली क्रीडांगणे नागरिकांसाठी खुली करत नसल्याने युवक व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात पोहोचलेली असताना नागरिकांना क्रीडांगण उपलब्ध करून देणे हा शासनाचा स्पष्ट निर्णय असतानाही नगरपरिषदेची उदासीन भूमिका चिंताजनक असल्याचे संजय काळे यांनी नमूद केले. सदर भूखंड शासनाचाच असल्याने नगरपरिषदेने शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून आरक्षण क्रमांक ९९ अंतर्गत क्रीडांगण विकसित करावे, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर व मुख्याधिकारी, कोपरगांव नगरपरिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!