Homeताज्या बातम्यासावधान! मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर रील बनवणं पडेल महागात

सावधान! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर रील बनवणं पडेल महागात

मिसिंग लिंक’ वर हायटेक सीसीटीव्हीची नजर, थेट कारवाईचा बडगा!

लोणावळा:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ (कनेक्टिंग लिंक) सुरू होताच पर्यटकांची आणि वाहनचालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या निसर्गरम्य मार्गावर गाडी थांबवून ‘सेल्फी’ काढण्याचा किंवा ‘रील’ बनवण्याचा मोह आता तुमच्या खिशाला मोठी कात्री लावणार आहे. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, “एक सेल्फी थेट जेलची हवा किंवा मोठा दंड”देऊ शकते.

बोगद्यात ‘स्टंटबाजी’ कराल तर गाठ पोलिसांशी!

मिसिंग लिंकवरील केबल स्टेड ब्रिज आणि भव्य बोगदे पाहण्यासाठी वाहनचालक चक्क रस्त्याच्या मध्यभागी किंवा पुलावर गाड्या थांबवत असल्याचे समोर आले आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असून यामुळे भीषण अपघाताची टाळ टांगती आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) याची गंभीर दखल घेतली असून, आता अशा ‘हौशी’ प्रवाशांवर महामार्ग पोलिसांचा तिसरा डोळा नजर ठेवून आहे.

२४ तास ‘CCTV’ ची नजर

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील सर्व बोगदे आणि पुलांवर २४ तास सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे कुठेही गाडी थांबवून निसर्गसौंदर्य टिपण्याचा किंवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्यास, तत्काळ दंडाची पावती फाडली जाणार आहे.

वेगमर्यादेचे नियम लागू

वाहतूक विभागाने अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध वाहनांसाठी सुधारित वेगमर्यादा देखील जाहीर केली आहे:

हलकी वाहने (कार): जास्तीत जास्त १०० किमी/ताशी.

बस व जड प्रवासी वाहने: जास्तीत जास्त ८० किमी/ताशी.

प्रशासनाचा ‘रुद्र’ अवतार:

“सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी मिसिंग लिंकच्या महामार्गावर थांबणे हा गुन्हा ठरणार आहे. तुमच्या एका बेजबाबदार कृत्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो,” अशा कडक शब्दांत प्रशासनाने प्रवाशांना सुनावले आहे. आता केवळ समज दिली जाणार नाही, तर मोठ्या दंडाची आकारणी केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

गाय छाप तंबाखू पुड्यांवरील चित्र हटवण्याची मागणी; ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटनेचा इशारा

कोपरगाव, दि.६.दिलीप गायकवाड तंबाखूच्या पुड्यांवर वापरण्यात येणाऱ्या ‘गाय छाप’ तसेच गाय दुधाचे चित्र असलेल्या चिन्हांवर बंदी घालून ते तात्काळ हटवावे, अशी मागणी ‘माझं गाव माझा...

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला

बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

Pune Child Rape-Murder Case: ‘कपडे भरून गळफास’: पोस्टमॉर्टममध्ये श्वासोच्छवासामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा पुणे बाल...

पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

error: Content is protected !!