Homeताज्या बातम्याकोपरगावचे माजी नगराध्यक्ष कालकथित बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांच्या सामाजिक व चळवळीतील योगदानाचा...

कोपरगावचे माजी नगराध्यक्ष कालकथित बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांच्या सामाजिक व चळवळीतील योगदानाचा गौरव; कुटुंबीयांना सन्मानपत्र प्रदान

कोपरगाव, दि.२६ ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात कोपरगाव नगरपरिषदेचे कालकथित माजी नगराध्यक्ष कै. बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांच्या सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेअंतर्गत हा भव्य बौद्ध समाज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कै. बाळाभाऊ धोंडीबा शिंदे हे कोपरगाव तालुक्यातील बौद्ध समाजातील नामवंत नेते होते. त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही भूषविले होते. सन १९५० ते १९९० या कालखंडात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन त्यांच्या नावाने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) चे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते कै. शिंदे यांच्या कुटुंबीयांना हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी अशोकराव शिंदे, साहेबराव शिंदे, मंगलताई शिंदे, सचिन शिंदे, तेजस शिंदे, आम्रपाली शिंदे, नितल घुसळे आदी उपस्थित होते.

कालकथित बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांच्या कार्याचा अशा प्रकारे गौरव झाल्याने कोपरगाव परिसरातील बौद्ध समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याला उजाळा मिळाल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशांकडे RTO चे दुर्लक्ष; २५ नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

बेकायदेशीर डर्ट बाईक्स विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी; अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन कोपरगाव, दि.२५ ( दिलीप गायकवाड ) शहरात बेकायदेशीरपणे डर्ट बाईक्सची विक्री होत असल्याचा आरोप करत,...

कोकमठाण येथे पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची आज भक्तिमय वातावरणात सांगता

काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि कीर्तनाने रंगला सोहळा; ग्रामस्थ व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग कोपरगाव, दि.२४.( दिलीप गायकवाड) कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण (तीन-चारी) येथे कार्तिक मासानिमित्त आयोजित...

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या संरक्षण भिंतीच्या प्रकरणी शेकाप आक्रमक; वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन

महानगरपालिका प्रशासनावर कोणती कारवाई केली? नोटीस बजावली का? याबाबत पोलिसांकडे लेखी खुलासा आणि नोटिसीची प्रत देण्याची मागणी   ठाणे : वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्क...

नशामुक्ती अभियान व जनजागृती संवादाचे आयोजन; व्यसनमुक्त समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन

ठाणे, दि.१९.( अजय मगरे ) व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था सक्षम व्हावी आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक ...

रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न;रिपब्लिकन ऐक्याला नव्या उमेदीने सुरुवात…*

मुंबई , दि.१८.(प्रतिनिधी) महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कार्यरत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई येथील शहीद...

error: Content is protected !!