Homeताज्या बातम्याधारावीत 'आयात' उमेदवारांच्या एन्ट्रीने स्थानिक कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढली

धारावीत ‘आयात’ उमेदवारांच्या एन्ट्रीने स्थानिक कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढली

आयात उमेदवारांच्या चर्चांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांत नाराजी

मुंबई, दि. २ : मंगेश म्हात्रे

मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच धारावी भाजपच्या उमेदवारांच्या चर्चांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. विशेषतः ‘आयात उमेदवार’ आणण्याच्या शक्यतेमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी उसळली असून, धारावीच्या राजकारण ढवळून निघालं आहे. याचे पडसाद सोशल मीडियावर दिसत आहेत. “स्थानिक नेतृत्व असताना बाहेरचे उमेदवार का लादले जात आहेत ?”  अशी खंत स्थानिक भाजप कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

भाजपच्या आयात उमेदवाराच्या चर्चेत वर्सोव्यातील महिला पदाधिकारी आणि सायन कोळीवाडयामधील माजी नगरसेवकांच्या नावांची चर्चा गती घेताच, स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीला आणखी उधाण आले. नगरसेवक पद ही तळागाळातील कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते. त्यामुळे  “स्थानिक चेहऱ्यावर मतं मिळतात, तर आयात उमेदवाराचा आग्रह कशासाठी?” असे सवाल कार्यकर्त्यांकडून विचारले जात आहेत.

भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य उदय नांदे यांनी बहुजन शक्ती न्यूजशी बोलताना स्पष्ट मत मांडले :   “मी बाहेरून येणाऱ्यांच्या विरोधात नाही, पण स्थानिक कार्यकर्त्यांचा हक्क हिरावला जाऊ नये. उमेदवार स्थानिक असावा. “हारला तर स्थानिक कार्यकर्ता हारेल, जिंकला तर स्थानिक कार्यकर्ता जिंकेल. पण आयात उमेदवार दिला विरोधकांना अपप्रचार करण्याची आयती संधी मिळते. तर दोन्हीकडून स्थानिक कार्यकर्त्यांला रोषाला सामोरे जावे लागते. स्थानिक चेहऱ्यासाठी प्रत्येक वॉर्डातील इच्छुकांनी आवाज उठवला पाहिजे. यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे .” नांदे यांनी सांगितल.

बाहेरील उमेदवारामुळे स्थानिक नागरिकांमध्येही अस्वस्थता वाढताना दिसते. त्यांच्यातील चर्चेत नेहमी ऐकू येणारा मुद्दा एकच—“आमच्याकडे पुरेसे नेतृत्व असताना बाहेरचा उमेदवार का? तो आमचं प्रतिनिधित्व करणार तरी कसं?” काही मतदारांनी तर स्पष्ट इशारा दिला आहे की, आयात उमेदवार दिल्यास मतदानात नाराजी दिसून येऊ शकते.

धारावीत भाजपची राजकीय समीकरणे आधीच कमजोर मानली जातात—ना नगरसेवक, ना आमदार. अशा परिस्थितीत बाहेरील उमेदवारांचा आग्रह का केला जातो? असा सरळ सवाल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!