Homeताज्या बातम्या‘उपवर्गीकरण मागे घ्या, अन्यथा ३१ जुलैला महाराष्ट्र बंद’; बीड ते मुंबई लाँग...

‘उपवर्गीकरण मागे घ्या, अन्यथा ३१ जुलैला महाराष्ट्र बंद’; बीड ते मुंबई लाँग मार्चच्या सांगता सभेत सरकारला थेट इशारा

मुंबई | प्रतिनिधी

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. बीड ते मुंबई लाँग मार्चच्या सांगता सभेत डॉ. सिद्धार्थ शिनगारे यांनी सरकारला थेट इशारा देत, “उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ मागे घ्या, अन्यथा ३१ जुलै रोजी महाराष्ट्र बंद पुकारला जाईल,” अशी घोषणा केली.

चैत्यभूमी येथे झालेल्या सभेत बोलताना शिनगारे म्हणाले की, सरकारने तातडीने उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबविण्याची अधिकृत घोषणा केली, तर महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्यास आम्ही तयार आहोत. मात्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, “मुंबई आणि पुणे बंद झाले, तर तो महाराष्ट्र बंदच ठरेल. आमचा संघर्ष सामाजिक न्यायासाठी असून सरकारने याची गंभीर दखल घ्यावी.”

बीड ते मुंबई लाँग मार्चला राज्यभरातून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आंदोलक आणि नागरिकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत, “आम्ही भीमाची औलाद आहोत, कुणालाही घाबरणारे नाही. आमच्या नादी कोणी लागू नये,” असे ठाम शब्दांत सांगितले.

दरम्यान, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापले असून, सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारच्या निर्णयावर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!