Homeताज्या बातम्यानागपूरच्या न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची धडक कारवाई; परवान्याविना ठेवलेला २० लाखांचा औषधसाठा...

नागपूरच्या न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची धडक कारवाई; परवान्याविना ठेवलेला २० लाखांचा औषधसाठा जप्त

रुग्णांना एका विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती उघड; प्रिस्क्रिप्शनची प्रतही न दिल्याचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी

नागपूरमधील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये औषध विक्रीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत उघड झाला आहे. हॉस्पिटलच्या तळघरात कोणताही वैध परवाना नसताना विक्रीसाठी साठवून ठेवलेला तब्बल २० लाख १५ हजार २९० रुपयांचा औषधसाठा एफडीएने जप्त केला असून संबंधितांविरुद्ध औषधे व प्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे एफडीएच्या नागपूर पथकाने २७ जून रोजी लकडगंज येथील न्यू एरा हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल स्टोअरची तपासणी केली. औषधसाठ्याच्या पडताळणीत मोठी तफावत आढळल्यानंतर हॉस्पिटलच्या तळघरातील एका खोलीत मोठ्या प्रमाणात परवान्याशिवाय औषधे विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आले. संबंधितांकडे औषध विक्रीचा परवाना तसेच खरेदी-विक्रीची आवश्यक कागदपत्रे नसल्याने एफडीएने संपूर्ण साठा जप्त केला.

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली. रुग्णालयातील संगणक प्रणालीद्वारे थेट मेडिकल स्टोअरला औषधांची ऑर्डर पाठवून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्याच दुकानातून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे आढळले. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची प्रतही रुग्णांना दिली जात नसल्याचे निदर्शनास आले.

विशेष म्हणजे, १२ जून २०२६ रोजी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधून औषधे घेण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र न्यू एरा हॉस्पिटलमध्ये या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. आवश्यक सूचना फलकही रुग्णालयात लावण्यात आलेला नव्हता.

याशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये केमिस्ट अँड ड्रगिस्टचा नामफलक नसणे, कालबाह्य औषधांची स्वतंत्र व्यवस्था नसणे, शेड्युल एच-१ औषधांच्या नोंदीत तफावत आणि निरीक्षण पुस्तिका उपलब्ध नसणे असे अनेक गंभीर नियमभंगही एफडीएच्या निदर्शनास आले. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

दरम्यान, रुग्णांना औषधे कोणत्याही अधिकृत मेडिकलमधून खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणतेही हॉस्पिटल किंवा मेडिकल जबरदस्ती करत असल्यास नागरिकांनी तात्काळ एफडीए कार्यालयाशी किंवा टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘उपवर्गीकरण मागे घ्या, अन्यथा ३१ जुलैला महाराष्ट्र बंद’; बीड ते मुंबई लाँग मार्चच्या सांगता...

मुंबई | प्रतिनिधी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. बीड ते मुंबई लाँग मार्चच्या सांगता सभेत...

दिशाभूल करणाऱ्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याविरुद्ध FDA ची धाड; दहा लाखांचा माल जप्त

छत्रपती संभाजीनगर,दि.२७( सचिन एडके ) अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने वैजापूर तालुक्यातील गंगापूर येथे पॅकेज्ड...

नांदर; येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा शालेय क़्रिडा स्पर्धेत पैठण तालुक्यातुन द्वितीय क्रमांक..

दावरवाडी ता २६(अभिजित सोनवणे ) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा क्रिडा व युवक संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर...

TET पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्री यांना निवेदन; सीबीआय चौकशीची ठाणे शहर शेकापकडून मागणी

ठाणे, दि.२७.( अजय मगरे )   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे स्थगित करण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

error: Content is protected !!