सुनीलजी शांतीलालजी बंब यांची कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी निवड
समाजासाठी अभिमानास्पद क्षण
कोपरगाव दि.१ ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी सुनीलजी शांतीलालजी बंब यांची एकमुखाने निवड झाली असून, या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
“जेव्हा कर्तृत्व नम्रतेच्या वलयाने झळकतं, तेव्हा ते सर्वांच्या ह्रदयात घर करतं,” हे वाक्य श्री बंब यांच्या व्यक्तिमत्वावर सार्थ ठरते. बँकेच्या व्यवस्थापनात आणि सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या श्री. बंब यांची ही निवड केवळ कोपरगावकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
याआधीही त्यांची श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांच्या संयम, समर्पण व समाजसेवेच्या कार्यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
त्यांची ओळख जैन कॉन्फरन्स झोन ४ चे उपाध्यक्ष, कोपरगांव पीपल्स बँकेचे संचालक, तसेच श्रावक संघ कोपरगावचे ट्रस्टी म्हणूनही आहे. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांची अष्टपैलू कार्यशैली अधोरेखित होते.
श्री. बंब यांच्या चेअरमनपदी झालेल्या निवडीमुळे बंब कुटुंबियांचे तसेच सर्व समाजाचे मन भरून आले आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेची पावती आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कोपरगावकरांकडून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात, असून बहुजन शक्ती तर्फे त्यांना शुभेच्छा…




















