Homeताज्या बातम्याकल्याणच्या बुद्धभूमीसाठी स्वतंत्र प्राधिकरण; ५०० कोटींच्या जागतिक धम्मकेंद्र प्रकल्पाला गती

कल्याणच्या बुद्धभूमीसाठी स्वतंत्र प्राधिकरण; ५०० कोटींच्या जागतिक धम्मकेंद्र प्रकल्पाला गती

मुंबई : अजय मगरे

कल्याण येथील चिकणघर परिसरातील बुद्धभूमीच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउद्देशीय प्रकल्प उभारला जाणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.

त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आनंदराज आंबेडकर, बुद्धभूमी फाउंडेशनचे पदाधिकारी, भन्ते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील सुमारे १३.९६ हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. या प्राधिकरणात सामाजिक न्याय विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी सहभागी असतील.

फाउंडेशनने सादर केलेल्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या ‘जागतिक बुद्धभूमी धम्मकेंद्र’ आराखड्यात ६० मीटर उंचीची बुद्धमूर्ती, ३२ मजली भगवान गौतम बुद्ध बहुउद्देशीय थीम भवन, महाबोधी महाविहाराची प्रतिकृती, विपश्यना केंद्र, भिक्खू-भिक्खुणी प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, चिल्ड्रेन होम, पशु-पक्षी चिकित्सालय, कायदेविषयक सल्ला केंद्र आणि राष्ट्रीय महापुरुषांची स्मारके उभारण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण संकुल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिलांसाठी स्वावलंबन प्रशिक्षण केंद्र, वृद्धाश्रम, ग्रंथालय, संगणकयुक्त अभ्यासिका तसेच ध्यान व आध्यात्मिक केंद्र विकसित करण्याचाही आराखडा बैठकीत मांडण्यात आला.

सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि बौद्ध पर्यटनाचा संगम घडवणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी नवा विकासाचा मानबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मंत्री शिरसाट यांनी संबंधित यंत्रणांना विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!