Homeताज्या बातम्याकोपरगांव बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी; 

कोपरगांव बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी; 

सोयाबीनचे दर ही समाधानकारक नाहीत.

कोपरगांव, दि.६ : दीपक साटोटे

कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असली तरीही दरात कोणतीही समाधानकारक वाढ न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

आज बाजार समितीत ८८३२ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असून, त्याला किमान ४०० ते कमाल १४०० रुपये दरम्यान भाव मिळाला. सर्वसाधारण दर सुमारे ११०० रुपये प्रतिक्विंटल इतका होता. कांद्याच्या अत्यल्प दरामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पावसाळ्यात कांदा साठवणे कठीण असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा बाजारात आणला होता. मात्र प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात भाव कोसळल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसला आहे.

सोयाबीनबाबत बोलायचे झाले, तर ३२ क्विंटल आवक झाली असून त्याला किमान ४६२९ ते कमाल ४७१४ रुपये, आणि सरासरी ४६७५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सध्या सोयाबीनचे दर स्थिर असले तरीही दरवाढ होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी किमान ५००० रुपये दर मिळावा अशी मागणी केली आहे.

इतर शेतमालाचे दर पुढीलप्रमाणे : गहू: ८० क्विंटल आवक, दर २६४९ ते २७०० रुपये, सरासरी दर २६८० रुपये

हरभरा: १ क्विंटल आवक, दर ५९२१ रुपये…

मका: १ क्विंटल आवक, दर २५०० रुपये…

ज्वारी व बाजरी: कोणतीही आवक नाही…

बाजार समितीत शेतमाल विक्री व्यवस्थेबाबत अनेक शेतकऱ्यांनी असमाधान व्यक्त केले असून, भाववाढीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ते करत आहेत. कांद्याच्या आणि सोयाबीनच्या दरात लवकरच सुधारणा होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!