Homeताज्या बातम्याठाणे गुन्हे शाखेचा दणका; २४ गुन्हे उघड, ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे गुन्हे शाखेचा दणका; २४ गुन्हे उघड, ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे,दि.८.( प्रतिनिधी )

ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या जबरी चोरी आणि बसमधील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांचा तपास करत गुन्हे शाखा घटक-१ ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन सराईत पुरुष आरोपी आणि दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ₹५२.३४ लाख किमतीचे ३२ तोळे सोन्याचे दागिने, ५ मोटारसायकली, १ अग्नीशस्त्र, १ जिवंत काडतूस आणि १ धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सऊद सिराज खान उर्फ सऊद काळ्या (२५) आणि स्वप्नील हरीश माधवानी उर्फ बाबू अरखट्या (२०) यांचा समावेश आहे. तसेच बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या संगीता दशरथ पीठकर (४५) व सुरेखा बजरंग गायकवाड (४७) या महिला आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आरोपींकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील एकूण २४ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सऊद सिराज खान याच्याविरुद्ध यापूर्वी एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो फरार असल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध प्रोक्लेमेशन ऑर्डर देखील जारी केली होती. अखेर गुन्हे शाखेने त्याला अटक करण्यात यश मिळवले.

या कारवाईत कळवा, चितळसर, नारपोली, नौपाडा, मुंब्रा, ठाणे नगर, तुर्भे, उरण, टिळकनगर तसेच पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले विविध चोरी, जबरी चोरी व शस्त्र बाळगण्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

मा. पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!