Homeताज्या बातम्याभरतनाट्यम गुरू तेजस्विनी चव्हाण आचरेकर यांना राज्याचा युवा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर....

भरतनाट्यम गुरू तेजस्विनी चव्हाण आचरेकर यांना राज्याचा युवा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर….

लोककला–अभिजात नृत्य संवर्धनातील कार्याला मानाचा मुजरा

मुंबई, दि.२ अजय मगरे

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे जाहीर झालेल्या २०२५ सालच्या महाराष्ट्र राज्य युवा सांस्कृतिक पुरस्कारासाठी प्रसिद्ध भरतनाट्यम शिक्षिका व लोककला संशोधक तेजस्विनी चव्हाण-आचरेकर यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सौ. आचरेकर या अनेक वर्षांपासून भरतनाट्यमचे प्रशिक्षण, संशोधन आणि सृजनशील सादरीकरण यांसाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील लोककला, लोकपरंपरा आणि विधीनाट्यांचे अभ्यास–दस्तावेजीकरण या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले असून त्यांच्या ‘शब्दवेध’, ‘गोंधळ’, ‘बोहाडा’ आणि ‘महाराष्ट्राची विधीनाट्ये’ ही चार पुस्तके शासन प्रकाशित आहेत. राज्यातील प्रयोगशील कलाविश्वावर त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि मासिकांतून प्रभावी लेखनही केले आहे.

भारतीय अभिजात भरतनाट्यमबरोबरच त्यांनी लोकनृत्यांचे सादरीकरण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केले असून त्यांच्या प्रयोगांना व्यापक प्रशंसा मिळाली आहे. सध्या त्या मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. संशोधन कार्य करीत आहेत. तरुण पिढीत नृत्यकलेची अभिरुची वाढावी, तसेच लोककलांचा वारसा जतन व्हावा यासाठी त्यांनी राबविलेले विविध उपक्रम राज्यभर कौतुकास्पद ठरले आहेत.

या निर्णयाचे कलाविश्वात स्वागत झाले असून, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कार वितरण सोहळा लवकरच पार पडणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!