कोपरगाव : दिलीप गायकवाड
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील मोहनीराज नगर परिसरात महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची श्रद्धाभावाने पूजा करून सण उत्साहात साजरा केला.

यावेळी महिलांनी वटवृक्षाला पांढरा धागा गुंडाळून सात प्रदक्षिणा घातल्या. पारंपरिक गीते म्हणत वटसावित्री व्रताचे विधी पूर्ण करण्यात आले. पतीच्या दीर्घायुष्याची, कुटुंबाच्या सुख-समृद्धीची आणि आरोग्याची प्रार्थना करत महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले.
मोहनीराज नगरासह परिसरातील विविध ठिकाणीही महिलांनी मोठ्या उत्साहात वटसावित्री पौर्णिमा साजरी केली. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक वातावरण आणि सामूहिक पूजनामुळे परिसर भक्तिमय




















