विमा प्रतिनिधींचे भव्य स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
छ.संभाजीनगर, दि.१४ : नितीन एडके
भारतीय जीवन विमा निगमच्या जीवन झेप टीम तर्फे विमा प्रतिनिधींचे भव्य स्नेह संमेलन रविवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी दौलताबाद येथील फोर्ट व्हिव रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडले.
या भव्य मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक द्वारकाप्रसादजी कुमावत (क्षेत्रीय व्यवस्थापक – विपणन/सी.एल.आय.ए.पश्चिम विभाग) यांनी प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल चौधारे (वरिष्ठ व्यवस्थापक – ९८डी शाखा) व मच्छिंद्र सोनवणे (सी.एल.आय.ए.) उपस्थित होते.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून उदय
सुदुंब्रेकर (वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक), राजेश इंगोले (सहायक शाखा व्यवस्थापक – ९८डी), शरद जाधव (सी.एल.आय.ए.) तसेच एम.एम. पेदे (व्यवस्थापक – सी.एल.आय.ए.) यांनी उपस्थित राहून प्रतिनिधींना प्रेरणादायी विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन लक्ष्मण डी. चव्हाण (जीवन झेप टीम प्रमुख, कोहिनूर ऑफ मराठवाडा प्लॅटिनम ब्रिगेड, सी.एल.आय.ए., एम.डी.आर.टी.–अमेरिका, सी.एम. क्लब सदस्य) यांनी केले.
संपन्न झालेल्या या मेळाव्यात सर्व विमा प्रतिनिधींनी भारतीय जीवन विमा निगमच्या माध्यमातून समाजाच्या अधिक व्यापक सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.




















