Homeताज्या बातम्याडिजिटल मीडिया पत्रकारांसाठी ‘डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र’ संघटनेची स्थापना;मुंबई, ठाणे विभागीय कमिटी...

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी ‘डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र’ संघटनेची स्थापना;मुंबई, ठाणे विभागीय कमिटी जाहीर

छ.संभाजीनगर, दि. १४ : अजय मगरे

सन १९३९ पासून कार्यरत आणि आचार्य अत्रे यांच्यासारख्या दिग्गज पत्रकारांनी नेतृत्व केलेल्या ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद’ तर्फे डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी स्वतंत्र संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या संघटनेचे नाव ‘डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र’ असे असून, तिचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात उत्साहात पार पडले.

या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी भूषविले. अधिवेशनासाठी राज्यभरातून तब्बल हजाराहून अधिक डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.

मुंबई विभागासाठी निमंत्रक सदस्य म्हणून गणेश जगताप, तुषार खरात, परेश मोटे, उदय कासारे, केतन खेडेकर आणि तानाजी कांबळे यांची घोषणा करण्यात आली. तसेच ठाणे विभागासाठी नेहा गायकवाड, अजय मगरे, सतशील मेश्राम, सुनील विश्वकर्मा, संतोष खरात आणि भुजंग सोनकांबळे यांची निवड झाली.

यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई कमिटीच्या कार्यकारिणीत नव्या सदस्यांचा समावेश जाहीर करण्यात आला. यात सुनील शिंदे, उमेश शेट्ये, तेजस वाघमारे, मारुती मोरे, सुरेश गायकवाड आणि बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

नवीन निवड झालेल्या सर्व सदस्यांचे स्वागत व अभिनंदन अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल वाघमारे, विभागीय सचिव दीपक कैतके आणि मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबईचे अध्यक्ष राजा आदाटे , सचिव दीपक पवार यांनी केले. यावेळी पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी ही नव्या पिढीतील टीम प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!