Homeताज्या बातम्यामराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत दुग्धविकास प्रकल्प राबविणार..

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत दुग्धविकास प्रकल्प राबविणार..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्ली येथे बैठक

मुंबई, दि. ७ : अजय मगरे

विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकासाला नवे बळ मिळणार आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) आणि मदर डेअरीच्या सहकार्यातून या भागात दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत या प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत शेतकऱ्यांना दूध संकलन, चारा लागवड आणि दुधाळ जनावरांच्या संख्यावाढीसाठी प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. राज्याचे पशुसंवर्धन सचिव एन. रामास्वामी, आयुक्त प्रवीणकुमार देवरे, एनडीडीबीचे चेअरमन डॉ. शहा तसेच प्रकल्प संचालक डॉ. बोरानी व डॉ. श्रीधर उपस्थित होते.

या प्रकल्पाद्वारे मराठवाड्यातील दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढविणे, उच्च दर्जाच्या गाई-म्हशींचे वितरण, तसेच पशु पूरक खाद्य, फॅट व एसएनएफ वर्धक पदार्थांचा पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय बहुवार्षिक चारा पिकांसाठी विशेष अनुदान, विद्युत चलित कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप आणि दूध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. या माध्यमातून ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

बीड जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात मागणीपत्र

बीड जिल्ह्यातील विविध विकास कामांसह अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र सादर केले. गडकरी यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

दरम्यान, सावरगाव घाट येथे झालेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी नितीन गडकरी यांचा राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीद्वारे सत्कार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!