Homeताज्या बातम्याअशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्वाभिमानी जीवन जगा’ पुस्तकाचे प्रकाशन

अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्वाभिमानी जीवन जगा’ पुस्तकाचे प्रकाशन

कोपरगाव, दि.५.( दिलीप गायकवाड )

अशोक विष्णुपंत शिंदे यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वाभिमानी जीवन जगा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कोपरगाव विधानसभा क्षेत्राच्या प्रथम महिला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना पुस्तकाच्या प्रती भेट म्हणून प्रदान करण्यात आल्या.

पुस्तकाचा उद्देश व शिंदे यांचे मत

शिंदे यांनी संवाद साधताना सांगितले की, ‘स्वाभिमानी जीवन जगा’ या पुस्तकाद्वारे सकारात्मक जीवनमूल्ये, स्वाभिमानाची जपणूक आणि समाजाभिमुख कार्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमात उपस्थितांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घकाळाच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.

प्रमुख उपस्थितांचा गौरव

या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी मेहबूब पठाण, काँग्रेस किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, अरूण लोढे, तसेच बहुजन शक्ती न्यूजचे कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड यांना पुस्तकाच्या प्रती भेट स्वरूपात देण्यात आल्या.

शिंदे यांचे चार दशकांचे योगदान

अशोक शिंदे हे गेली ४० वर्षे सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. २०११ मध्ये त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ते फुले-शाहू-आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, बोधिसत्व सामाजिक व सांस्कृतिक सेवा संघ, बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोपरगाव शहर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गट) कोपरगाव या अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

कार्यक्रमाचे औचित्य साधत नागरिकांनी शिंदे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!