Homeताज्या बातम्याकोपरगावातील रुग्णालय-शाळा परिसर ‘साइलेंट झोन’ करण्याची ‘माझं गाव माझा अभिमान’ची मागणी

कोपरगावातील रुग्णालय-शाळा परिसर ‘साइलेंट झोन’ करण्याची ‘माझं गाव माझा अभिमान’ची मागणी

कोपरगाव : दि.२, किशोर शेलार,

कोपरगाव शहरातील रुग्णालये, शाळा तसेच न्यायालय परिसराच्या १०० मीटर परिघाला ‘शांतता क्षेत्र’ (साइलेंट झोन) घोषित करून ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणावे, अशी मागणी ‘माझं गाव माझा अभिमान’ मोहिमेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना स्मरणपत्र देण्यात आले.

मोहिमेचे प्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपरिषदेकडे निवेदन देऊन शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालय परिसराभोवती १०० मीटर क्षेत्र ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० आणि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आणण्याची विनंती करण्यात आली होती.

मात्र, अद्याप या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय, शाळा आणि न्यायालय परिसरात शांतता राखण्यासाठी ‘साइलेंट झोन’ची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे मोहिमेतर्फे सांगण्यात आले आहे.

याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ध्वनी प्रदूषण नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी ‘माझं गाव माझा अभिमान’ मोहिमेच्या वतीने करण्यात आली आहे. विनय भगत, मयुर आव्हाड, अमित आढाव, व विजय जाधव, यांनी निवेदन देऊन या सोबत ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या पत्राची प्रत व शासन निर्णयाची प्रतही जोडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशांकडे RTO चे दुर्लक्ष; २५ नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

बेकायदेशीर डर्ट बाईक्स विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी; अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन कोपरगाव, दि.२५ ( दिलीप गायकवाड ) शहरात बेकायदेशीरपणे डर्ट बाईक्सची विक्री होत असल्याचा आरोप करत,...

कोकमठाण येथे पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची आज भक्तिमय वातावरणात सांगता

काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि कीर्तनाने रंगला सोहळा; ग्रामस्थ व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग कोपरगाव, दि.२४.( दिलीप गायकवाड) कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण (तीन-चारी) येथे कार्तिक मासानिमित्त आयोजित...

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या संरक्षण भिंतीच्या प्रकरणी शेकाप आक्रमक; वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन

महानगरपालिका प्रशासनावर कोणती कारवाई केली? नोटीस बजावली का? याबाबत पोलिसांकडे लेखी खुलासा आणि नोटिसीची प्रत देण्याची मागणी   ठाणे : वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्क...

नशामुक्ती अभियान व जनजागृती संवादाचे आयोजन; व्यसनमुक्त समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन

ठाणे, दि.१९.( अजय मगरे ) व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था सक्षम व्हावी आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक ...

रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न;रिपब्लिकन ऐक्याला नव्या उमेदीने सुरुवात…*

मुंबई , दि.१८.(प्रतिनिधी) महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कार्यरत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई येथील शहीद...

error: Content is protected !!