Homeताज्या बातम्याफाउंटन हॉटेल परिसरात २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त; शेकापच्या...

फाउंटन हॉटेल परिसरात २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त; शेकापच्या माहितीवर FDAची कारवाई

ठाणे, दि. ३०.( प्रतिनिधी )

शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधून महाराष्ट्रात खासगी प्रवासी बसमधून सीटखाली लपवून संशयित भेसळयुक्त माव्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पक्षाला मिळाली. त्यानंतर तायडे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांना माहिती दिली.

FDAच्या अधिकाऱ्यांनी फाउंटन हॉटेल परिसरात संबंधित खासगी बसांची तपासणी केली. या कारवाईत अंदाजे २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला असून पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.

यावेळी ऋषिकेश तायडे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात शेतकरी कामगार पक्ष सातत्याने लढा देईल, अशी भूमिका मांडली. भेसळयुक्त अन्नपदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कठोर कारवाईसाठी पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच नागरिकांनी त्यांच्या परिसरात भेसळयुक्त अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीबाबत संशयास्पद माहिती आढळल्यास ती तात्काळ प्रशासनाला कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!