काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि कीर्तनाने रंगला सोहळा; ग्रामस्थ व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
कोपरगाव, दि.२४.( दिलीप गायकवाड)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण (तीन-चारी) येथे कार्तिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची आज (दि. २४ नोव्हेंबर २०२६) भक्तिमय वातावरणात सांगता होत आहे.
अंजनीसुत सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, कोकमठाण यांच्या अंतर्गत तसेच कोकमठाण (तीन-चारी) ग्रामस्थांच्या सहकार्याने दि. २० नोव्हेंबरपासून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली.
सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि प्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पाच दिवसांच्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
आज सप्ताहाच्या सांगतेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमातून धार्मिक परंपरेचे जतन, अध्यात्मिक विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकोपा जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
#कोकमठाण #कोपरगाव #अखंडहरिनामसप्ताह #सप्ताहसांगता #कार्तिकमास #अंजनीसुतसेवाचॅरिटेबलट्रस्ट #BahujanShaktiNews




















