Homeताज्या बातम्याकोपरगाव व पुरंदर येथे बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारणार – मंत्री दत्तात्रय...

कोपरगाव व पुरंदर येथे बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारणार – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि.२१ ( दिलीप गायकवाड )

पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सुसज्ज बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यावे, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

या संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार विजय शिवतारे, आमदार आशुतोष काळे, अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, उपसचिव श्री. पांढरे आदी उपस्थित होते.

बैठकीत मंत्री भरणे म्हणाले की, पुरंदर क्रीडा संकुलात बहुउद्देशीय सभागृह, योगा हॉल, जिम्नॅस्टिक सुविधा, चेंजिंग रूम, बॅडमिंटन हॉल तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांचा समावेश असावा. शासनाच्या अनुदान मर्यादेत काम पूर्ण करावे व उर्वरित निधी तालुका क्रीडा संकुल समितीने स्वबळावर उभारावा, असे निर्देश त्यांनी दिले.

कोपरगावसाठी नव्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले असून, शहराच्या मध्यवर्ती भागात अद्ययावत सुविधांनी युक्त संकुल उभारण्यावर भर देण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील शालेय विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांहून अधिक असल्याने हे संकुल नवोदित क्रीडापटूंना घडवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही मंत्री भरणे यांनी नमूद केले.

या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यास हातभार लागणार असून, महाराष्ट्रातल्या क्रीडाक्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

error: Content is protected !!