Homeताज्या बातम्याचैतन्य नगरातील रहिवाशांचे ग्रामपंचायतीकडे सामूहिक निवेदन ;

चैतन्य नगरातील रहिवाशांचे ग्रामपंचायतीकडे सामूहिक निवेदन ;

रस्ता द्या, घंटागाडी सुरू करा, ओपन स्पेसमध्ये सीबिबट्याचा वावर!

कोपरगाव, दि.१८ : ( चंद्रकांत जोर्वेकर )

कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चैतन्यनगर परिसरातील नागरिकांनी आपल्या मूलभूत समस्या मांडत सामूहिक निवेदनाद्वारे सरपंच सतीश केकाण,ग्रा.सदस्य भाऊसाहेब भाबड आणि ग्रा सदस्य नाईक सर यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

रहिवाशांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून वर्षभरापासून घंटागाडी न आल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पावसाळ्यात चिखल व घाण, तर उन्हाळ्यात धूळ व दगड यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परिणामी, परिसरात आजारपण वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याचबरोबर, धारणगाव रोड लगतच्या चैतन्यनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. ओपन स्पेसमध्ये सुमारे वीस फूट उंच बाभळी वाढल्या बिबट्याला लपण मिळाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदनात रहिवाशांनी पुढील मागण्या केल्या आहेत;

चैतन्यनगरमधील ओपन स्पेसची तातडीने साफसफाई करावी.

रस्त्यांची दुरुस्ती अथवा नवीन रस्ता बांधून द्यावा.

नियमित घंटागाडी सुरू करून स्वच्छतेची व्यवस्था करावी.

“आमच्या सामूहिक निवेदनावर तातडीने लक्ष घालून ग्रामपंचायतीने आवश्यक ती कारवाई करावी,” अशी ठाम मागणी चैतन्य नगरातील रहिवाशी सुकदेवराव जाधव,अनिल जाधव, निलेश जगताप,राजेंद्र वाघ,सुनील शिंदे, अजय शिंदे,सुनील कोंढारे,राहुल नरोडे,अनिल कानडे,सुनील पवार,सुरेश कोळी,भोलानाथ लकारे,अशोक बोराडे,गणेश शेळके,विभावरी मसाने, दीपक गरजे, गवंडी एलजी,विठ्ठल धनाड, कल्पना उंबरकर

सुभद्राबाई जाधव,शितल जगताप,कामिनी त्रिभुवन,मिना वाघ,शारदा नरोडे,उज्वला कोंढारे

पूजा गरजे, गिरीजा कानडे,कोमल पवार,अलका मगर, काजल कोळी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

error: Content is protected !!