Homeताज्या बातम्याजाहिरातीतून एसटीला २५० कोटींचा महसूल...

जाहिरातीतून एसटीला २५० कोटींचा महसूल…

लालपरी’ला नवा आर्थिक वेग – प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : अजय मगरे

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची सेवा न करता महसूलवाढीचेही नवे चाक फिरवणार आहे. पुढील पाच वर्षांत जाहिरातींच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी मुख्यालयात झालेल्या ३१० व्या संचालक मंडळ बैठकीत ते बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहायक कामगार आयुक्त पल्लवी सहारे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटीची २५१ आगारे आणि ६१० हून अधिक बसस्थानके राज्यभर कार्यरत आहेत. सुमारे १२ हजार बसेस दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. भविष्यात बससंख्या वाढल्यानंतर ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इतक्या व्यापक पोहोच असलेल्या माध्यमावर जाहिरात देणे म्हणजे उत्पादकांसाठी मोठी संधी आहे.”

बसस्थानके, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे पुढील पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या जाहिरातींद्वारे दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. तिकीट विक्रीव्यतिरिक्त पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न वाढल्यास एसटीला आर्थिक स्थैर्य मिळेल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!