Homeताज्या बातम्याठाण्यात मराठी नामफलक वाद;

ठाण्यात मराठी नामफलक वाद;

शाळांचा सर्व व्यवहार मराठीत करण्याची काँग्रेसची मागणी

ठाणे, दि. ४ : अजय मगरे

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने शाळांना मराठी नामफलक लावणे सक्तीचे केले असतानाच आता यावरून नवे राजकीय समीकरण तापू लागले आहे. “नामफलकापुरतेच मर्यादित नका राहू; शाळांचा सर्व व्यवहार मराठीतच व्हावा,” अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

शासनाच्या २०१४ च्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून मनपाने आठ दिवसांच्या आत मराठी नामफलक लावण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र, काँग्रेसने हा निर्णय अपुरा असल्याचे सांगत शाळांतील पत्रव्यवहार, रोजनिशी, अर्ज, हजेरी, हिशेब, निकालपत्रे यासह सर्व कागदपत्रे मराठीतच असावीत, असा ठाम आग्रह धरला आहे.
मराठी ही राज्यभाषा असून ती केवळ फलकांपुरती मर्यादित ठेवणे हा मराठीचा अपमान आहे. मुलं मराठीत शिकतात, पण शाळेच्या ऑफिसातील व्यवहार इंग्रजी किंवा हिंदीत होतात. खरा सन्मान तेव्हाच होईल, जेव्हा सर्व कागदपत्रे मराठीत मिळतील,” असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिक्षण विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजप-शिवसेना केवळ नामफलकांवर भर देत असताना, काँग्रेसने दैनंदिन व्यवहाराचा मुद्दा पुढे आणल्याने राजकीय तापमान वाढले आहे.

दरम्यान, मराठीवादी संघटनांनीही या मागणीचे स्वागत केले आहे. “फलकापुरते आदेश मर्यादित ठेवले, तर मराठीची उपेक्षा थांबणार नाही. शाळांचे सर्व व्यवहार मराठीत झाल्यासच मुलांना खरी मातृभाषेची ताकद मिळेल,” असे स्थानिक संघटनांचे म्हणणे आहे.
ठाण्यातील अनेक पालकांनीही यास पाठिंबा दर्शवला आहे. आता ठाणे मनपा शिक्षण विभाग पुढील निर्णयात फक्त नामफलकांपुरते थांबते की सर्व व्यवहार मराठीत करण्यास सुरुवात करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!