Homeताज्या बातम्याम्हाडा नाशिक मंडळाची ४७८ सदनिकांसाठी सोडत जाहीर

म्हाडा नाशिक मंडळाची ४७८ सदनिकांसाठी सोडत जाहीर

मुंबई, दि. ४ : मंगेश म्हात्रे

म्हाडा नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रमातून झाला.

गंगापूर, देवळाली, पाथर्डी, म्हसरुळ, नाशिक व आगर टाकळी शिवार येथील विविध प्रकल्पांतील सदनिकांचा या सोडतीत समावेश आहे. सर्व सदनिका अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत.

या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व भरणा ४ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करता येणार असून, अनामत रकमेचा भरणा ४ ऑक्टोबरपर्यंत RTGS/NEFT द्वारे करता येईल. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १७ ऑक्टोबर रोजी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

जयस्वाल यांनी अर्जदारांना https://housing.mhada.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा म्हाडा लॉटरी ॲपद्वारेच अर्ज करण्याचे आवाहन केले. “म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रणालीत मानवी हस्तक्षेपास वाव नसून, प्रक्रिया पारदर्शक व सुलभ आहे,” असे ते म्हणाले.

यापूर्वी नाशिक मंडळाने ३७९ सदनिका, १०५ दुकाने व ३२ भूखंडांचे यशस्वी वितरण केले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!