Homeताज्या बातम्याठाण्यातील मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांच्या पात्रता व परवान्यांची तपासणी करण्याची FDA कडे शेकापची...

ठाण्यातील मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांच्या पात्रता व परवान्यांची तपासणी करण्याची FDA कडे शेकापची मागणी

ठाणे दि.२१.प्रतिनिधी 

ठाणे शहरातील मेडिकल स्टोअर्समध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता, वैध परवाने आणि संबंधित कागदपत्रांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या औषध विक्री व्यवसायात नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी अपात्र व्यक्तींकडून औषध विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध अनियमित घटनांच्या पार्श्वभूमीवर मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांची पात्रता तपासणे गरजेचे असल्याचे तायडे यांनी नमूद केले आहे.

अलीकडील काळात ठाणे आणि परिसरात बोगस डॉक्टर, बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सुरू असलेले वैद्यकीय व्यवसाय तसेच आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामुळे औषध विक्री केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वैध परवाने आहेत की नाही, याची FDA विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, अपात्र कर्मचारी, परवान्यांच्या अटींचा भंग किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधित मेडिकल स्टोअर मालक व जबाबदार व्यक्तींविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि औषध विक्री क्षेत्रात पारदर्शकता व कायद्याचे पालन सुनिश्चित व्हावे, यासाठी FDA ने विशेष तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे,” असे मत ऋषिकेश तायडे यांनी व्यक्त केले.

या मागणीमुळे ठाण्यातील मेडिकल स्टोअर्सच्या कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित होण्याची शक्यता असून FDA प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!