Homeताज्या बातम्यापहिल्याच पावसात वाहून गेला शिर्डी बायपासचा सर्व्हिस रोड; नागरिकांचा संताप, दर्जेदार कामाची...

पहिल्याच पावसात वाहून गेला शिर्डी बायपासचा सर्व्हिस रोड; नागरिकांचा संताप, दर्जेदार कामाची मागणी

कोपरगाव : दिलीप गायकवाड

अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बायपास मार्गावर कोपरगाव तालुक्यातील पुणतांबे फाटा येथे सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रविवार (दि. २८ जुन) सायंकाळी सुमारे ७ वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसात पुलाच्या पूर्व बाजूस काही महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला सर्व्हिस रोड वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे.

सोमवारी दि.२९ सकाळी संबंधित ठेकेदार यादव कन्स्ट्रक्शन कंपनीने हा मार्ग बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले. अपूर्ण असलेल्या पश्चिमेकडील मार्गावर वाहतूक वळविण्यात आली. वाहून गेलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असल्याचे दिसून आले.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ता बांधकामात आवश्यक दगड-खडी व डांबराचा दर्जेदार वापर न करता केवळ मुरूम टाकून त्यावर डांबराचा पातळ थर देण्यात आल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

श्री जगदंबा माता मंदिर ते जगताप वस्ती दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. या समस्येची माहिती स्थानिक आमदारांनाही असून त्यांनी स्वतः या भागाची पाहणी केल्याचे नागरिकांनी सांगितले. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

यादव कन्स्ट्रक्शन कंपनी, संबंधित यंत्रणा आणि राज्य सरकारने या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याशिवाय, या परिसरात यापुढे वाहतूक कोंडी होऊ नये, रस्त्यावर पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, अपघात प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच पुणतांबे फाटा येथे २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशा मागण्याही नागरिकांनी केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त मोहनीराज नगरात वटवृक्षाची श्रद्धाभावाने पूजा

कोपरगाव : दिलीप गायकवाड वटसावित्री पौर्णिमेनिमित्त कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील मोहनीराज नगर परिसरात महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची श्रद्धाभावाने पूजा करून सण उत्साहात साजरा केला. यावेळी महिलांनी वटवृक्षाला...

ग्रामीण भाग अंधारात; महावितरणचा गलथान कारभार!

कोपरगाव तालुक्यातील भारनियमन तातडीने बंद करा; शेतकरी नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांची मागणी कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण भारनियमनामुळे शेतकरी,...

बोकुड जळगाव उपकेंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर,दि.२९.( प्रतिनिधी ) प्राथमिक आरोग्य केंद्र निलजगाव अंतर्गत उपकेंद्र बोकुड जळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम डॉ. भूषण...

कोपरगावात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची नागरिकांत चर्चा

कोपरगाव, दि.२९.दिलीप गायकवाड राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (२८ जून) कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. भारतरत्न...

कोपरगावत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; जेऊर कुंभारीत नागरिकांची मोठी गर्दी

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील ब्रँच कॅनॉललगत असलेल्या भानुदास शामराव वक्ते यांच्या शेतातील विहिरीत रविवारी रात्रीच्या वेळी एक जिवंत बिबट्या...

error: Content is protected !!