Homeताज्या बातम्याम्हाडात तेराव्या लोकशाही दिनी १५ अर्जांवर तत्काळ सुनावणी...

म्हाडात तेराव्या लोकशाही दिनी १५ अर्जांवर तत्काळ सुनावणी…

१५ वर्ष प्रतीक्षेतील दौलत अधिकारी अवघ्या ४ तासांत कायमस्वरूपी घरासाठी पात्र….

मुंबई, दि.१५ : मंगेश म्हात्रे

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज वांद्रे येथील गृहनिर्माण भवनात तेरावा लोकशाही दिन पार पडला. या बैठकीत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली एकूण १५ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

या लोकशाही दिनी नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणांवर जलदगतीने तोडगा काढण्यात आला. त्यात कामाठीपुरातील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवासी दौलत अधिकारी यांचा १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला बृहत सूचीवरील पात्रतेचा प्रश्न सोडवून त्यांना अवघ्या चार तासांत कायमस्वरूपी घरासाठी पात्र घोषित करण्यात आले.

याशिवाय, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे गृहनिर्माण योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटाच्या सदनिकेसाठी निवड झालेल्या परंतु आर्थिक अडचणींमुळे विलंब शुल्क भरू न शकलेल्या राज्य परिवहन कर्मचारी साहेबराव गायकवाड यांचे ७५ हजार विलंब शुल्क माफ करून त्यांना उद्याच सदनिकेचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोअर परळ येथील तुळशी बिल्डिंगच्या पुनर्विकासातील पोटमाळा क्षेत्र समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अर्ज करणाऱ्या ज्ञानदेव ओरोसकर यांच्या प्रकरणी पुढील सात दिवसांत सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच,श्रीमती रिद्धी वाजे यांच्या दुहेरी सदनिका प्रकरणी एका सदनिकेचा ताबा परत घेऊन दुसरी सदनिका देण्याचे निर्देश,

गिरगाव येथील दोन खोलींच्या ताब्यासाठी कमलेश समदानी यांच्या प्रकरणी विकासकांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आदेश,

बोरीवली गोराई येथील अंगारकी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या २००३ पासून प्रलंबित असलेल्या लेखापरीक्षणाला ४५ ते ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश,

अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांद्वारे नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यात आला.

आजच्या लोकशाही दिनात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी संबंधित ५, कोकण मंडळाशी संबंधित ६, मुंबई मंडळाशी ३ व पुणे मंडळाशी संबंधित १ असे एकूण १५ अर्जांवर सुनावणी झाली.

लोकशाही दिनानिमित्त संजीव जयस्वाल यांनी म्हाडाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, जबाबदारी व न्यायप्रियतेला प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!