Homeताज्या बातम्याविटभट्ट्यांविरोधातील आंदोलन स्थगित; प्रशासनाचे एक महिन्यात कारवाईचे आश्वासन

विटभट्ट्यांविरोधातील आंदोलन स्थगित; प्रशासनाचे एक महिन्यात कारवाईचे आश्वासन

शिर्डी,दि.२२.दिलीप गायकवाड

शिर्डी येथे बेकायदेशीर विटभट्ट्यांविरोधात छावा क्रांतिवीर सेनेने सुरू केलेले बेमुदत अमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश अशोक शिंदे यांनी दि. २० रोजी आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता.

राहाता तालुका तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पिपळवाडी येथील विनापरवाना सुरू असलेल्या बेकायदेशीर विटभट्ट्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर तहसीलदार अमोल मोरे यांनी एक महिन्याच्या आत संबंधित विटभट्ट्यांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थितांना पाणी देत शांततेत आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहतच्या रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून,...

पीएमसी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करणार, कार्यकर्त्यांनी कारवाईला उशीर केला

पुणे : सिंहगड रोडवर एका महिलेचा अंगावर पडून मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी धोकादायक झाडे शोधण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उपक्रमाचे...

अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना 30 लाखांची मदत. पुणे बातम्या

पुणे: मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) टेम्पोचा चालक, मालक आणि विमा कंपनीला 9 मे 2017 रोजी मोटारसायकलला धडक दिल्याने मरण पावलेल्या व्यक्तीच्या...

‘किडनॅपिंग ते लूट’ ६ तासांत, ६ जणांना अटक”! अँटॉप हिल पोलिसांची वेगवान कारवाई

मुंबई - मंगेश म्हात्रे मुंबई पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या थराराने हादरली आहे! अपहरण करून कोट्यवधींची जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६ तासांत पर्दाफाश...

शिर्डीत विटभट्ट्यांविरोधात छावा क्रांतिवीर सेनेचा एल्गार; अमरण उपोषणाला सुरुवात

शिर्डी, दि.२१.दिलीप गायकवाड शिर्डी येथे बेकायदेशीर आणि विनावापर विटभट्ट्यांविरोधात छावा क्रांतिवीर सेनेने रणशिंग फुंकले असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत अमरण उपोषण सुरू करण्यात आले...

error: Content is protected !!