पुणे, दि.१५ : ( अजय मगरे )
शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी केलेले उपक्रमशील कार्य हे समाजाच्या प्रगतीचे पायाभूत कारण ठरते. अशा कार्याचा गौरव करण्यासाठी वृंदावन फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने आयोजित विसावा गुरुजन गौरव सोहळा १४ सप्टेंबर रोजी पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला ऑडिटोरियम, बीएमसीसी, शिवाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यातील मानाचा “वृंदावन उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२५” हा सन्मान नर्मदा कनिष्ठ महाविद्यालय, जायकवाडी उत्तर (ता. पैठण) येथील प्राचार्य संदीप उत्तमराव काळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. परागजी काळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. रामदासजी चवरे (अध्यक्ष, संत चोखामेळा अध्यासन केंद्र – ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत) यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.ह.भ.प. संतोषजी महाराज काळोखे (संत साहित्य अभ्यासक व कीर्तनकार), अनिल रावसाहेब सौंदडे (अध्यक्ष, श्रीखंडोबा संस्थान, जेजुरी) आणि उषाताई गायकवाड (सहाय्यक लेखा अधिकारी, ग्रामीण पोलीस मुख्यालय, पुणे) उपस्थित होते.
या सोहळ्याचे यशस्वी आयोजन सचिन पाटील, प्रा. देविदास बिनवडे, प्रा. विनोद सूर्यवंशी, आशिष यादव, श्रीमती अंजली पाटील आणि अविनाश अभंगराव यांनी केले. त्यांच्या उत्तम नियोजनामुळे हा कार्यक्रम शिस्तबद्ध व संस्मरणीय ठरला.
या सन्मान सोहळ्यासाठी पैठण तालुक्यातील मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये सीनियर मॅनेजर कॅपिटा नारायण गाढे, उपप्राचार्य प्रवीण राऊत, उद्योजक प्रवीण काशीद, सिनिअर इंजिनिअर इरो… यांचा समावेश होता.




















