Homeताज्या बातम्याहर्षीचे आरोग्य उपकेंद्र बनले समस्येचे माहेर घर, आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने...

हर्षीचे आरोग्य उपकेंद्र बनले समस्येचे माहेर घर, आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रूग्णांची गैरसोय.

पैठण,दि.३ ( अभिजीत सोनवणे )

प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या हर्षी आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

या आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत हर्षी बुद्रुक, हर्षी खुर्द,सोनवाडी खुर्द,सोनवाडी बुद्रुक,दादेगाव खुर्द,दादेगाव बुद्रुक या सहा गावांचा समावेश आहे.
येथे एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सहाय्यीका असे दोन कर्मचा-यांची नियुक्ती असुन गेल्या अनेक दिवसांपासून एकच आरोग्य सहाय्यीका या आरोग्य उपकेंद्राचा भार सांभाळत आहे.

सदरील आरोग्य सहाय्यीकावर दावरवाडी आरोग्य उपकेंद्र, थेरगाव उपकेंद्र,नांदर येथील उपकेंद्राचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असुन यामुळे सहा गावांतील रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
या आरोग्य उपकेंद्रात फक्त २६ जानेवारी ,१५ ऑगस्ट,१ मे,१७ सप्टेंबर या दिवशीच कर्मचारी उपस्थित राहत असल्याने परिसरातील रूग्णांना पाचोड किंवा पैठण या ठिकाणी खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत असुन ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.असे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे यांनी सांगितले.

येत्या दोन दिवसांत या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी उपस्थित न राहिल्यास हर्षी आरोग्य उपकेंद्रा समोर आमरण उपोषणाचा इशारा दादासाहेब आगळे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया :-
डॉ.समाधान पाचोडे (वैद्यकीय अधिकारी नांदर प्राथमिक आरोग्य केंद्र):- नांदर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सहा आरोग्य उपकेंद्र असुन सध्या तिनं आरोग्य सहाय्यीका व चार आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहे.वरिष्ठांकडे या विषयावर लेखी स्वरूपात कळविण्यात आले असून लवकरच ही पदे भरण्यात येणार असून येणाऱ्या काळात अशी गैरसोय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!