सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत
ठाणे, दि.९.( अजय मगरे)
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात वाजत-गाजत आगमन करण्यात आले.
ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गणेशभक्तांच्या उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, स्थानिक नगरसेविका वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, , तसेच शाखाप्रमुख, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणरायाच्या आगमनाने अंबिका नगर परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात बाप्पाचे दर्शन घेत जल्लोष केला.




















