Homeताज्या बातम्याघरफोड्यांचा सराईत गुन्हेगार अखेर वागळे इस्टेट पोलिसांच्या जाळ्यात..

घरफोड्यांचा सराईत गुन्हेगार अखेर वागळे इस्टेट पोलिसांच्या जाळ्यात..

ठाणे, दि.९ : अजय मगरे

वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोड्यांच्या मालिका उकलत कुख्यात दिपक वैश्य (४०, रा. गोवंडी, मुंबई) या घरफोड्या आरोपीला अखेर गजाआड केले. तब्बल १५ पेक्षा अधिक घरफोड्यांमध्ये वाँटेड असलेल्या या आरोपीकडून सोन्या–चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी सुरेखा खेडेकर यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ८२ हजारांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली होती. २७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या मोडस ऑपरेंडीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.

तपास सुरू असताना आरोपी तीन हात नाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून ६ डिसेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता आरोपीला नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७०४/२०२५, ७०८/२०२५ आणि ७१०/२०२५ या तीन घरफोड्यांची कबुली दिली. तसेच श्रीनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे उघड केले.

या यशस्वी कारवाईमध्ये परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण सावंत, पोलीस निरीक्षक (प्रशासन) देवकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील संतोष मगरे , छोटू दाभाडे , नितीन चव्हाण ,संदीप पाटील , भूषण गावडे आदी अधिकारी–कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे जिल्ह्यासाठी डीपीसी अंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद: सुनेत्रा पवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री...

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

उपकरप्राप्त इमारतींच्या रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडाची डिजिटल तक्रार प्रणाली सुरू

ट्रान्झिट रेंटच्या तक्रारींवर आता झटपट कारवाई मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाने दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू आणि रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत डिजिटल...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

error: Content is protected !!