Homeताज्या बातम्याअभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबईतील सहकार भवनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई : मंगेश म्हात्रे

अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा. येथील नागरिकांना एकत्रित घेऊन, प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या मोठ्या घरात राहण्याचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विक्रोळीतील कन्नमवार नगर, येथील मुंबई हाउसिंग फेडरेशन लि. संचालित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उद्घाटन व प्रतीक्षानगर, सायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री सह पालकमंत्री मुंबई उपनगर मंगल प्रभात लोढा, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, महापौर रितू तावडे, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, आमदार अमित साटम, माजी खासदार राहुल शेवाळे, म्हाडा प्राधिकरण उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी म्हाडा मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महेंद्र कल्याणकर, मुख्य अधिकारी इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ मिलिंद शंभरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असून, त्यातून प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रशासकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या भवनात आधुनिक कॉन्फरन्स हॉल, प्रशिक्षण कक्ष आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.राज्यात सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व असून, विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी शंभर टक्के डिजिटायझेशन, कार्यालयांचे विकेंद्रीकरण आणि विविध सुधारणा राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!