Homeताज्या बातम्याउद्योजकता विकासासाठी प्रदीर्घ सेवासमार...   एमसीईडी'चे विभागीय अधिकारी डॉ.अभिराम डबीर निवृत्त

उद्योजकता विकासासाठी प्रदीर्घ सेवासमार…   एमसीईडी’चे विभागीय अधिकारी डॉ.अभिराम डबीर निवृत्त

ठाणे, दि. ३० : अजय मगरे

उद्योजकता विकास चळवळीत आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) पुणे विभागीय अधिकारी डॉ. अभिराम डबीर यांनी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी निहित वयोमानानुसार सन्मानपूर्वक निवृत्ती घेतली. तब्बल ३२ वर्षे उद्योजकीय प्रेरक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी बजावलेल्या कार्याचा आज विविध स्तरावरून गौरव होत आहे.

अमरावतीचे मूळ रहिवासी असलेले डॉ. डबीर यांनी पुण्यातील सेवाकाळात महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत उद्योजकता आणि कौशल्य विकासाची ज्योत पोहोचवली. अत्यंत नाविन्यपूर्ण प्रशिक्षण तंत्र, उद्योजक निर्मितीला प्राधान्य आणि शेकडो प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना स्वावलंबनाकडे नेण्याचे काम केले.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव नेहरू युवा केंद्र (एमसीईडी) आणि भारतीय उद्यमिता विकास संस्था (ईडीआयआय) यांच्यातर्फे अनुक्रमे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम उद्योजकता प्रेरक प्रशिक्षक पुरस्कारांनी करण्यात आला आहे.

उच्च शैक्षणिक पात्रतेसह सखोल अभ्यासाची जोड असलेल्या डॉ. डबीर यांनी उद्योजकता, मराठी उद्योजकीय साहित्य आणि कौशल्य विकासावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सादर केलेले त्यांच्या संशोधन लेखांनी या क्षेत्राला दिशादर्शन केले. ‘उद्योजक’ या एमसीईडी प्रकाशित मासिकाचे विभागप्रमुख म्हणून मागील ३० वर्षांत त्यांनी केलेले चिकित्सक व अभ्यासपूर्ण लेखन हे त्यांच्या आर्थिक–सामाजिक व्यासंगाचे प्रतीक मानले जाते.

उद्योजकतेचा प्रसार हा आयुष्यभराचा ध्यास मानून काम केलेल्या डॉ. अभिराम डबीर यांची निवृत्ती ही कार्याचा अंत नसून नवे पर्व असल्याचे सहकारी, विद्यार्थी आणि हितचिंतक मानतात. राज्यभरातील उद्योजक, सहकारी, प्रशिक्षणार्थी आणि शुभेच्छुकांकडून त्यांना भविष्यातील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!