Homeताज्या बातम्यागोकर्ण गणेश मंदिरात संकष्टी चतुर्थी उत्साहात; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते आरती.....

गोकर्ण गणेश मंदिरात संकष्टी चतुर्थी उत्साहात; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते आरती…..

कोपरगाव, दि.७ : दिलीप गायकवाड

प्रभाग क्रमांक ६ गावठाण परिसरातील कापड बाजार येथील पुरातन श्री गोकर्ण गणेश मंदिरात रविवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि तालुक्यातील लोकप्रिय युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा व आरती भक्तिभावाने संपन्न झाली.

यावेळी सोशल मीडियावर अल्पावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांका परदेशीचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिला पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सौ. ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, भाजपा–आरपीआय–मित्र पक्ष लोकसेवा आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रमादित्य सातभाई, कापड बाजार उत्सव समितीचे पदाधिकारी, व्यापारी बांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमास कुणाल लोणारी, आशिष निकुंभ, निखिल जोशी, शुभम भावसार, राहुल खडांगळे, मयूर खडांगळे, सनी खैरे, योगेश पवार, नितीन जोशी, ओम बागुल आदी मित्रपरिवार उपस्थित होता.
धार्मिक विधीनंतर सर्व भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक सहभागाने परिपूर्ण असा संकष्टी चतुर्थीचा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांची...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, सरकारने आंदोलकांशी संवाद साधून संवाद साधावा पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

error: Content is protected !!