Homeताज्या बातम्यालोकमान्यनगरमध्ये विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचे लोकार्पण;

लोकमान्यनगरमध्ये विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचे लोकार्पण;

शुद्ध पाण्यासाठी आर.ओ. प्लांटचा लाभ

ठाणे,दि.२०.( अजय मगरे )

ओवळा–माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर विभागात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. साईनाथ मित्र मंडळ (ठा.म.पा. शाळा क्र. ४६ जवळ, पाडा नं. २), लोकमान्य नगर पाडा क्र. १ तसेच उन्नती पाण्याची टाकी, शिवाई नगर येथे हे उपक्रम राबविण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत विहिरींची स्वच्छता, दुरुस्ती, गाळ काढणे, पाणीसाठा वाढविणे तसेच पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच आर.ओ. प्लांट उभारण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.

वाढते शहरीकरण आणि घटती भूजल पातळी लक्षात घेता अशा प्रकारचे उपक्रम काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार असून, टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना वर्षभर पाण्याचा स्थिर पुरवठा मिळणार असून, पर्यावरण संवर्धन व जलसंधारणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे परिसर अधिक जलसमृद्ध व स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना ठाणे शहर प्रमुख व नगरसेवक राजेंद्र पाठक, राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभागप्रमुख भगवान देवकते, रामचंद्र गुरव, संतोष धमाले, देवेंद्र साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!