Homeताज्या बातम्याशिर्डीत शिवसेनेचा भव्य मेळावा; संजय राऊतांचा महायुतीवर तोफखाना धडाडणार

शिर्डीत शिवसेनेचा भव्य मेळावा; संजय राऊतांचा महायुतीवर तोफखाना धडाडणार

कोपरगाव : दिलीप गायकवाड

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा येत्या २ जून रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. साई किमया गार्डन, एअरपोर्ट रोड येथे दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

या मेळाव्यास शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीवर ते भाष्य करणार असून कार्यकर्त्यांना आगामी राजकीय लढ्याची दिशा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मेळाव्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यास जिल्हाभरातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, राजेंद्र दळवी तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवासेना, महिला आघाडी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, कोपरगावचे शिवसेना तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी शेतकरी बांधवांनाही मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “महायुती सरकारच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि संघर्षाची दिशा ठरवण्यासाठी सर्वांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील राजकीय घडामोडी आणि शेतकरी प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्यातून शिवसेना आगामी राजकीय रणशिंग फुंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!