मुंबई, दि.१३ : प्रतिनिधी
शॉ किआ (मॅक्स इको मोबिलिटी) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, भारती कंपाउंड, कलिना येथील कर्मचाऱ्यांनी आज युवा नेते व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पत्रकार मेहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांची भेट घेतली.
कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांनी खासदारांना निवेदन दिले. या प्रकरणी ताई वर्षा गायकवाड यांनी शॉ किआ कंपनीसोबत चर्चा करून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असून, कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.




















