कोपरगाव : विजय जावरे
संत भीमा भोई महाराज यांच्या 176 व्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे प्रतिमा पूजन व सरबत वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. धारणगाव रोडवरील शिवनेरी चौक येथे मंगळवार, 26 मे रोजी आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधव आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात संत भीमा भोई महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित नागरिकांना सरबताचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संत भीमा भोई महाराज यांनी दिलेल्या मानवता, समता आणि समाजप्रबोधनाच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमास नगरसेवकांसह समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपक बरदे, राहुल साटोटे, माणिक डहांके, सदाभाऊ साटोटे, निलेश शिवदे, रोहित लाडे, अक्षय बरदे, संदीप बरदे, संतोष बरदे, रविंद्र शिवदे, सोमनाथ लाडे, नरेश बरदे, आकाश मोरे, गणेश जावरे, पिंटू लाबोंळे, जावरे सर, सौरभ शिवदे, बळीराम साटोटे, नगरसेवक दत्तुभाऊ पगारे तसेच इम्तियाज आत्तार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. संत भीमा भोई महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




















