Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे ५४ टक्के काम पूर्ण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे ५४ टक्के काम पूर्ण

महापरिनिर्वाण दिनी एमएमआरडीएकडून प्रगती अहवाल जाहीर

मुंबई, दि.६ : मंगेश म्हात्रे

समस्त देशवासीयांना उत्सकुता असलेल्या मुंबईतील इंदू मिल परिसरात उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची अद्ययावत माहिती एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे प्रणेते चंद्रकांत भंडारे यांनी केलेल्या लेखी निवेदनाला दिलेल्या उत्तरात प्राधिकरणाने स्मारकाची एकूण भौतिक प्रगती ५४ टक्के झाल्याची माहिती स्पष्ट केली आहे.

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, स्मारकासाठीची सहायक इमारतींची स्ट्रक्चरल कामे पूर्णपणे १०० टक्के पूर्ण झाली असून सध्या इंटीरियर फिनिशिंगची कामे सुरू आहेत. मुख्य स्मारक इमारतीचे संरचनात्मक काम जलद गतीने सुरू असून पुतळ्याच्या पायथ्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. आंबेडकरांच्या विश्वविख्यात पुतळ्यासाठी लागणाऱ्या ६,००० टन स्ट्रक्चरल स्टीलपैकी १,४७८ टन स्टील तयार झाले आहे. त्यापैकी ६४० टन साईटवर प्राप्त झाले असून काम सुरू आहे.

२३० फूट उंचीचा पुतळा – मॉडेल पूर्ण

प्राधिकरणाने सांगितले की पुतळ्याचे १:१ थर्माकोल मॉडेल २३० फूट उंचीपर्यंत पूर्ण झाले आहे. पुतळ्यासाठी लागणाऱ्या ८५० टन कांस्य धातूपैकी १०७ टन धातू साईटवर प्राप्त झाला असून ५५ टन पॅनल कास्टिंग पूर्ण झाले आहे.

महापरिनिर्वाण दिनीच हा अहवाल जाहीर केल्याने स्मारकाच्या कामाबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट झाली आहे. पुढील काळात कामाचा वेग वाढवून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे एमएमआरडीए प्राधिकरणाने नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!