Homeताज्या बातम्यासंक्रमण शिबिरास शाहू नगरवासीयांचा ठाम नकार

संक्रमण शिबिरास शाहू नगरवासीयांचा ठाम नकार

धारावी पुनर्विकासावरून वातावरण तापले

मुंबई | मंगेश म्हात्रे

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर माहीम पूर्व येथील शाहू नगर वसाहतीतील रहिवाश्यांनी संक्रमण शिबिरात स्थलांतरास ठाम नकार दिला असून “हक्काचे घर मिळाल्याशिवाय इंचभरही हलणार नाही,” असा एकमुखी निर्धार व्यक्त केला आहे. या मुद्द्यावर शनिवारी सायंकाळी शाहू नगर येथे तातडीची बैठक घेण्यात आली.

शाहू नगर विकास समिती आणि डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. १३ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरावर चर्चा झाली होती. मात्र संक्रमण शिबिरात जाण्यास रहिवाशांनी स्पष्ट विरोध दर्शविल्याने हा मुद्दा अधिकच तापला आहे.

नगरसेविका हर्षलाताई मोरे यांनी सांगितले की, धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन अद्याप जाहीर झालेला नसताना रहिवाशांना कुठे घरे देणार याची स्पष्ट माहिती नाही. “अशा परिस्थितीत लोकांना स्थलांतरित करणे अन्यायकारक आहे. प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळेपर्यंत कोणालाही येथून हलू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक जोसेफ कोळी यांनीही संताप व्यक्त करत शाहू नगर ही धारावीतील सर्वांत चांगली वसाहत असल्याचे सांगितले. “डीआरपी आणि अदानी प्रकल्पामुळे कोळी समाजातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना हलविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

शाहू नगर भाडेकरू संघाचे माजी अध्यक्ष अरुण जाधव यांनी सांगितले की, “आम्ही आधीच एकदा स्थलांतरित आहोत. पुन्हा संक्रमण शिबिरात पाठविणे हा अन्याय आहे. पुनर्वसन शाहू नगरमध्येच झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी रहिवाशांना केले.

बैठकीत चार्ली ऍंथोनी यांनी एकजुटीचे आवाहन करत जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली. “एकजूट हीच आपली ताकद आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

दरम्यान, शाहू नगर परिसरात अस्वस्थतेचे वातावरण असून आगामी काळात रहिवासी तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. “हक्कासाठी लढू, पण घर सोडणार नाही,” असा आवाज बैठकीत उमटला.

या बैठकीस माजी आमदार बाबुराव माने,दिपक खंदारे डीआरपी सेक्टर १ रहिवाशी कृती समितीचे निमंत्रक आशिष मोरे, विवेक कांबळे, राजेश शर्मा, पत्रकार परेश मोटे तसेच धारावी बचावचे नसरूल हक्क,उलेश गजाकोश,शाखा प्रमूख मुत्तू पट्टन तसेच शाहू नगरचे मकरंद काणे,संजय मानकर,शेखर तोडणकर,विशाल जामदार, व्हिक्टर सालढाणा,दीपक वाघमारे,हरीश लेखक,गजानन पेडणेकर,भूषण नागवेकर,जयेश सैद,सेलिस्टीन रॉड्रिग्स,कुंदन शेजवळ आदी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

error: Content is protected !!