Homeताज्या बातम्या“म्हाडाचा मोठा निर्णय: ‘मास्टर लिस्ट’साठी ऑनलाईन अर्ज १ मेपासून”

“म्हाडाचा मोठा निर्णय: ‘मास्टर लिस्ट’साठी ऑनलाईन अर्ज १ मेपासून”

मुंबई : मंगेश म्हात्रे

वर्षानुवर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय म्हाडा कडून घेण्यात आला आहे. ‘मास्टर लिस्ट’च्या माध्यमातून पात्र भाडेकरूंना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ मेपासून सुरू होणार आहे.

म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून (आर.आर. बोर्ड) ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मध्य मुंबईतील अनेक उपकरप्राप्त इमारती अरुंद भूखंड, आरक्षण किंवा रस्ता रुंदीकरणामुळे पुनर्विकासासाठी अपात्र ठरल्या आहेत. तसेच काही ठिकाणी पुनर्रचना होऊनही गाळ्यांची संख्या अपुरी पडल्याने अनेक मूळ भाडेकरू वंचित राहिले. अशा रहिवाशांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ही अर्ज प्रक्रिया १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होऊन २० मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘सिटीझन कॉर्नर’मधील Application for Masterlist या पर्यायाद्वारे नोंदणी करून अर्ज सादर करावा. नोंदणीदरम्यान वापरलेल्या ई-मेल आयडी व पासवर्डच्या साहाय्याने लॉगिन करून अर्ज भरता येणार असून आवश्यक मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दरम्यान, यापूर्वी बृहतसूचीत पात्र ठरलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करू नये, तर ऑफलाईन अर्ज प्रलंबित असलेल्या अर्जदारांनी नव्याने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रे प्रत्यक्ष कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच सुनावणीवेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील, असे उपमुख्य अधिकारी लक्ष्मण मुंढे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणातील परिवर्तनाचे कौतुक केले, सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठ दीक्षांत समारंभात पदवीधरांना...

भारती विद्यापीठ डीम्ड विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी पार पडला. पुणे : केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी भारतातील वैद्यकीय...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहतच्या रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून,...

विटभट्ट्यांविरोधातील आंदोलन स्थगित; प्रशासनाचे एक महिन्यात कारवाईचे आश्वासन

शिर्डी,दि.२२.दिलीप गायकवाड शिर्डी येथे बेकायदेशीर विटभट्ट्यांविरोधात छावा क्रांतिवीर सेनेने सुरू केलेले बेमुदत अमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी...

error: Content is protected !!