Homeताज्या बातम्यानर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी....

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी….

महाराष्ट्र–बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

मुंबई, दि. ७ : मंगेश म्हात्रे

महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीच्या बाडेन–वुटेमबर्ग राज्यात प्रशिक्षण आणि करिअरच्या नवीन दालने खुली करणारा ऐतिहासिक संयुक्त करार झाला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन–वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त डॉ. अनिल भंडारी, संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसचिव डॉ. सुवर्णा खरात तसेच बाडेन–वुटेमबर्ग राज्यातील सामाजिक व्यवहार, आरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, “या करारामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांना जर्मनीत प्रगत प्रशिक्षण, भाषा शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. प्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच नोकरी स्वीकारणाऱ्या भारतीय नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत.” विद्यार्थी–प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रमांद्वारे नर्सिंग शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

बाडेन–वुटेमबर्गचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सांगितले, “आरोग्यसेवा क्षेत्रातील कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करणे, संशोधनाला चालना देणे आणि परदेशात रोजगार संधी निर्माण करणे हा या सहकार्याचा केंद्रबिंदू आहे. या भागीदारीमुळे दोन्ही राज्यांतील आरोग्यसेवा क्षमता अधिक सक्षम होणार आहे.”

बाडेन-वुटेमबर्ग राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचा दौरा केला होता. नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे व कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.

या उपक्रमामुळे महाराष्ट्र व बाडेन-वुटेमबर्ग राज्यांमधील आरोग्यसेवा व नर्सिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी अधिक बळकट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!