Homeताज्या बातम्याराज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी; महाराष्ट्रातून आठवले, तावडेंसह चौघांना तिकीट

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी; महाराष्ट्रातून आठवले, तावडेंसह चौघांना तिकीट

भाजपची राज्यसभेची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडुकते यांना संधी

मुंबई | प्रतिनिधी

राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे नेते विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडुकते यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी ४ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. या चारपैकी एक जागा मित्रपक्षाला देण्यात आली असून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

देशभरात राज्यसभेतील ३७ जागा रिक्त होणार असल्याने त्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ५ मार्च असून अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ७ मार्च आहे.

रिक्त होणाऱ्या ३७ जागांपैकी १२ जागा एनडीएकडे तर २५ जागांवर विरोधी पक्षांचे खासदार सध्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील ७ जागा रिक्त होत असून त्यासाठी ही निवडणूक होत आहे.

दरम्यान, भाजपने इतर राज्यांतील उमेदवारांचीही घोषणा केली आहे. बिहारमधून नितीन नवीन आणि शिवेश राम, आसाममधून तेरश गोवाला आणि जोगेन मोहन, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, हरियाणातून संजय भाटिया, ओडिशातून मोहनलाल सामल आणि सुजीत कुमार, तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!