Homeताज्या बातम्याकाँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला; प्रकार सीसीटीव्हीत कैद

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला; प्रकार सीसीटीव्हीत कैद

तुषार दामगुडेंवर कारवाईची मागणी

पुण्यात काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मित्र मंडळ चौक परिसरातील दैनिक पुढारी कार्यालयाजवळ हा प्रकार घडल्याची माहिती मिळत असून, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पवार यांना काही व्यक्तींनी अडवून धमकावत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवल्याचाही आरोप करण्यात आला असून या घटनेचा काँग्रेसकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या प्रकरणाचा निषेध करत राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात गुंड प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रवृत्तीला अभय देऊ नये,” असे ते म्हणाले.

सकपाळ यांनी पुढे सांगितले की, हल्ल्याप्रकरणी आरोपी तुषार दामगुडे याला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी. “कायद्याचा धाक राहिला पाहिजे, अन्यथा राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!